Ad will apear here
Next
‘गेटवे ऑफ इंडिया’ला ९५ वर्षे पूर्ण

मुंबई : भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ला चार डिसेंबर २०१९ रोजी ९५ वर्षे पूर्ण झाली. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११सालच्या ऐतिहासिक भारत भेटीच्या स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले. 

जॉर्ज यांच्या स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगला ई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेट यांनी बनविलेल्या आराखड्यानुसार १९१४ मध्ये कामाला सुरुवात झाली. १९२४मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आले. तत्पूर्वी, गेटवे ऑफ इंडियाच्या  दिल्ली येथे १९११मध्ये झालेल्या कार्यक्रमात याची फक्त प्रतिकृती किंग जॉर्ज (पाचवे) यांना दाखविण्यात आली होती. ३१ मार्च १९११ रोजी फक्त पायाभरणीचा कार्यक्रम करून कोनशिला बसविण्यात आली होती.


हे काम गॅमन इंडिया या ब्रिटिश कंपनीमार्फत करण्यात आले. याच गेटमधून ब्रिटिशांची शेवटची पलटण २८ फेब्रुवारी १९४८ रोजी समारंभपूर्वक बाहेर पडली. त्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. चार डिसेंबर १९२४ रोजी ही वास्तू लोकांसाठी खुली करण्यात आली. 


इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेले हे देखणे स्मारक सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बेसाल्ट दगडात याचे बांधकाम करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता. वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. तिच्या लांबीची एक बाजू पूर्वेकडील सागरतीराला समांतर असून, या बाजूत मधोमध मोठ्या आकाराचा कमानयुक्त दरवाजा व त्यालगत दोन्ही बाजूस छोटे दरवाजे आहेत. वास्तूची मागची बाजूही सारखीच आहे. या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्षे  लागली. मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते ‘गेट वे ऑफ इंडिया’. मुंबईत पाय ठेवला की पर्यटकांची पहिली भेट असते ती अर्थातच गेटवे ऑफ इंडियास. ही वास्तू ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू आहे.


या स्मारकाभोवती पाच जेट्टी (धक्के) आहेत. पहिली जेट्टी खास भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी आहे, तर दुसरी आणि तिसरी व्यावसायिक ‘फेरी ऑपरेशन’साठी वापरली जाते. इथून पर्यटकांना एलिफंटा लेण्यांकडे नेले जाते. चौथी बंद आहे आणि पाचवी रॉयल बॉम्बे याट क्लबसाठी आहे. 

(मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांविषयीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZXZCH
Similar Posts
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
सैर ऐतिहासिक झाशीची... १८ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाईचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘करू या देशाटन’ या सदरात माहिती घेऊ या झाशीची...
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
वास्तुसौंदर्याचा खजिना : ओरछा नगरी मध्य प्रदेशातील एकाहून एक सरस ठिकाणांची सैर आपण सध्या ‘करू या देशाटन’च्या माध्यमातून करत आहोत. गेल्या वेळी आपण ग्वाल्हेरमध्ये फेरफटका मारला. आजच्या भागात फिरू या ओरछा नगरीमध्ये.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language